Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ठेकेदाराकडून ४ लाखाची लाच घेणाऱ्या त्या दोन अधिकाऱ्यांसह पंटरला २६ मार्च पर्यंत कोठडी, एसीबीकडून अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

team by team
March 24, 2022
in क्राईम
0
ठेकेदाराकडून ४ लाखाची लाच घेणाऱ्या त्या दोन अधिकाऱ्यांसह पंटरला २६ मार्च पर्यंत कोठडी, एसीबीकडून अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी गावाच्या विकास कामांमधून ठेकेदाराकडून अभियंत्यांनी 43 लाख 75 हजार रुपयांची लाच मागून चार लाख रुपये टोकण रक्कम घेताना एसीबीने पकडल्यानंतर रात्री उशिरा कार्यालय व घरांचे झाडाझडती घेतल्याची माहिती प्राप्त झाली असून तिघांना २६ मार्च पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेलं भगदरी गाव राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीदेखील देण्यात आला आहे. जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन इमारत बांधणे, रस्ता सुधारणा, रस्ता जलनिस्सारणाची कामे यासह इतर 45 कामांचे आदेश देण्यात आले होते. सदर कामांच्या मोबदल्यात शासकीय ठेकेदाराला तब्बल आठ कोटी 45 लाख 89 हजार रुपये एवढी देयक आहे. त्यापैकी सदर विभागाच्या उप अभियंता सुनील पिंगळे व शाखा अभियंता एस.बी. हिरे यांनी ठेकेदाराचे 84 लाख रुपये राखुन ठेवले आहे. त्या मोबदल्यात शासकीय ठेकेदाराकडून ४३ लाखाच्या लाचेची मागणी केली होती. याचा पहिला हप्ता ४ लाख रुपये टोकण घेताना अक्कलकुवा पंचायत समितीमधील उप अभियंता सुनील पिंगळे व शाखा अभियंता एस बी हिरे यांच्यासह एक पंटरला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.दरम्यान काल रात्री उशिरा अटक केलेल्या पथकाद्वारे सदर अधिकाऱ्यांच्या कार्यालय व घराची झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांकडून आणखी किती रक्कम हस्तगत केली आहे याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप बोलणे टाळले असले तरी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील विकास कामांच्या मोबदल्यात अधिकाऱ्यांकडून एवढी मोठी रक्कम लाच मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान अक्कलकुवा येथे उप अभियंता सुनील पिंगळे व सहाय्यक अभियंता एस.बी.हिरे व एका पंटरला २६ मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोदलपाडा येथे याहा दिंडन गेर नृत्यात ५६० नृत्य कलाकारांनी केले नऊ चालींवर नृत्य सादर, हजारो नागरिकांची उपस्थिती

Next Post

धुरखेडा येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा

Next Post
धुरखेडा येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा

धुरखेडा येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add