Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोदलपाडा येथे २४ मार्च रोजी गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याचे आयोजन,नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचे आवाहन

team by team
March 23, 2022
in राजकीय
0
मोदलपाडा येथे २४ मार्च रोजी गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याचे आयोजन,नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचे आवाहन

नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सोजदान या गावात परंपरेनुसार गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याला सुरूवात झाली. या नृत्याचे कार्यक्रम (धुलिवंदन )दिवसापासून आयोजित करण्यात येतो .धुलिवंदनाच्या दिवशी सोजडान येथून सुरूवात होते.दि.२४ मार्च रोजी मोदलपाडा ता.तळोदा येथे गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याचे आयोजन करण्यात आले असुन नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केले आहे.
सातपुड्याला लागूनच असलेल्या आलिविहीर (सोजदान) येथील लोकप्रिय गेर डिंडन १९५१- ५२ मध्ये कुवरसिंग तापसिंग पाडवी यांनी सुरूवात केली होती .ही परंपरा त्याच्या नातू जगतसिंग गटवरसिंग पाडवी हे पुढे चालवत आहेत. होळीच्या दहा पंधरा दिवसाअगोदर पासून सुरु होणार्‍या गेर डिंडनच्या नृत्यात सहभागी होणार्‍या मुलांना मुली म्हणून संबोधण्यात येते. या प्रशिक्षणात पाच वर्षाच्या बालकापासून प्रौढवयीन व्यक्तीपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतो. नृत्यास येणार्‍यास धोती आणि पगडी ,पातळ असलेल्या पेहराव असतो.हातात दिंडन घेऊन बासरी,मांडूल ,ताठ यांच्या तालावर ते गेर दिंडनच्या नऊ चाली असतात सध्या सहभागी झालेले युवक व प्रौढवयीन पुरूष ज्या गावात नृत्य असेल तेथेच मुक्काम करावा लागणार आहे. या काळात ते नृत्यासाठी आलेले युवक व प्रौढ आंघोळ करत नाहीत .केवळ ते स्वतःचे ओठ आणि डोळे ओले करू शकतात. स्री सहवास टाळवा लागतो ,पायात चप्पल न घालणे,पाणी न ओलांडाणे आदी कडक नियम त्यांना पाळावे लागतात. सोजदान या गावात १८ मार्च पासुन परंपरेनुसार गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याला सुरूवात झाली.२४ मार्च रोजी तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी १२ वाजेपासुन या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात दोन वर्षानंतर निघाली जगदंबा देवी अवतार मिरवणूक

Next Post

१२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु

Next Post
१२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु

१२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add