नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोठडा येथे घराला लागलेल्या आगीत ७२ वर्षीय इसमाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली तर घराजवळच असलेली दोघे बैल देखील भाजले आहेत.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील कोठडा येथे एका शेतातील घराला दि.१७ मार्च रोजी रात्री ९.३० वाजेचा सुमारास अचानक आग लागली. रावजी वेस्ता वळवी (७२) वर्षे रा. कोठडा ता.नंदुरबार हे त्याचा शेतातील घरात रात्री ९.३० वाजेचा सुमारास बैलांना मच्छरापासून त्रास होवू नये म्हणून घराजवळ आगीचा धुर केला असता शेतात जोराची हवा सुरू असल्याने यातून ठिकाणी पडून घराला आग लागली. सदरी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र हवेच्या जोरामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि यात घर जळून खाक झाले. सदरच्या आगीत रावजी वळवी यांचाही होरपळून मृत्यू झाला. दरम्यान जवळच बांधलेली बैलजोडीदेखील भाजली गेले. सदरच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.पराडके उपस्थित होते. दरम्यान, उपनगर पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक केशव गावीत, वंतू गावीत, पो.ना.नारायण भिल, पो.का. बागुल आदी उपस्थित होते.








