नंदुरबार l प्रतिनिधी
समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने तुकाराम बीज आज साजरी करण्यात आली.
कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत धुळे चौफुलीलगत निलेश होंडा येथे सकाळी ९:३० वा.कार्यक्रम पार पडला.आर्थिक खर्चास फाटा देत ,मिरवणूक, डीजे वाद्य यापासून लांब राहत साधेपणाने जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी समाजबांधवांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित कार्याला उजाळा दिला.त्यांचे समाजजीवन घडविण्यात असलेले बहुमूल्य योगदान लक्षात घेता आपणही समाज म्हणून त्यादृष्टीने प्रयत्न करावेत,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या निमित्ताने समाजातर्फे वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी समस्त कुणबी पाटील समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणबी पाटील युवा मंच यांनी परिश्रम घेतले.








