Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोजदान येथून परंपरेनुसार “गेर डिंडन”नृत्याला प्रारंभ, २६ मार्च पर्यंत विविध गावात आयोजन

team by team
March 20, 2022
in सामाजिक
0
सोजदान येथून परंपरेनुसार “गेर डिंडन”नृत्याला प्रारंभ, २६ मार्च पर्यंत विविध गावात आयोजन

अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील आलिविहीर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोजदान या गावात परंपरेनुसार “गेर डिंडन” (याहा डिंडन ) नृत्याला सुरूवात झाली आहे. या नृत्याचे कार्यक्रम (धुलिवंदन )दिवसापासून आयोजित करण्यात येतो .धुलिवंदनाच्या दिवशी सोजडान येथून सुरूवात होऊन परिसरातील कोणत्या गावात गेर (डिंडन) नृत्य होणार याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सातपुड्याला लागूनच असलेल्या आलिविहीर (सोजदान) येथील लोकप्रिय गेर डिंडन १९५१- ५२ मध्ये कुवरसिंग तापसिंग पाडवी यांनी सुरूवात केली होती .ही परंपरा त्याच्या नातू जगतसिंग गटवरसिंग पाडवी हे पुढे चालवत आहेत. होळीच्या दहा पंधरा दिवसाअगोदर पासून सुरु होणार्‍या गेर डिंडनच्या नृत्यात सहभागी होणार्‍या मुलांना मुली म्हणून संबोधण्यात येते. या प्रशिक्षणात पाच वर्षाच्या बालकापासून प्रौढवयीन व्यक्तीपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतो. नृत्यास येणाऱ्यास धोती आणि पगडी ,पातळ असलेल्या पेहराव असतो.हातात दिंडन घेऊन बासरी,मांडूल ,ताठ यांच्या तालावर ते गेर दिंडनच्या नऊ चाली असतात सध्या सहभागी झालेले युवक व प्रौढवयीन पुरूष ज्या गावत नृत्य असेल तेथेच मुक्काम करावा लागणार आहे. या काळात ते नृत्यासाठी आलेले युवक व प्रौढ आंघोळ करत नाहीत .केवळ ते स्वतःचे ओठ आणि डोळे ओले करू शकतात. स्री सहवास टाळवा लागतो ,पायात चप्पल न घालणे,पाणी न ओलांडाणे आदी कडक नियम त्यांना पाळावे लागतात. यावेळी आलिविहीर गावाचे कारभारी उमेदसिंग बटेसिंग पाडवी, जगतसिंग गटवरसिंग पाडवी, प्रेमराज सुमेरसिंग पाडवी हे दरवर्षी नृत्याचे आयोजन करतात. यावेळी गेर दिंडन नृत्याच्या या कार्यक्रमाची पाहण्यासाठी जिल्ह्य़ातील मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी उपस्थिती .

असा असेल पुढील गेर डिंडन
१९ मार्च आलिविहीर, २०मार्च मौलीपाडा (ता.अक्कलकुवा ),२१ मार्च रतनपाडा (ता.तळोदा ), २२ मार्च नाला ( ता.अक्कलकुवा ),२३मार्च रामपूर, २४ मार्च मोदलपाडा, २५मार्च शिरवे ता.तळोदा ,२६ मार्च गणेश बुधावल असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तालुक्यातील युवक व गुजरात राज्यातील विवाहित तरुणी या प्रेमीयुगुलाचा रेल्वे स्थानकावर आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

कुणबी पाटील समाजातर्फे जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज साजरी

Next Post
कुणबी पाटील समाजातर्फे जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज साजरी

कुणबी पाटील समाजातर्फे जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add