अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील आलिविहीर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोजदान या गावात परंपरेनुसार “गेर डिंडन” (याहा डिंडन ) नृत्याला सुरूवात झाली आहे. या नृत्याचे कार्यक्रम (धुलिवंदन )दिवसापासून आयोजित करण्यात येतो .धुलिवंदनाच्या दिवशी सोजडान येथून सुरूवात होऊन परिसरातील कोणत्या गावात गेर (डिंडन) नृत्य होणार याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सातपुड्याला लागूनच असलेल्या आलिविहीर (सोजदान) येथील लोकप्रिय गेर डिंडन १९५१- ५२ मध्ये कुवरसिंग तापसिंग पाडवी यांनी सुरूवात केली होती .ही परंपरा त्याच्या नातू जगतसिंग गटवरसिंग पाडवी हे पुढे चालवत आहेत. होळीच्या दहा पंधरा दिवसाअगोदर पासून सुरु होणार्या गेर डिंडनच्या नृत्यात सहभागी होणार्या मुलांना मुली म्हणून संबोधण्यात येते. या प्रशिक्षणात पाच वर्षाच्या बालकापासून प्रौढवयीन व्यक्तीपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतो. नृत्यास येणाऱ्यास धोती आणि पगडी ,पातळ असलेल्या पेहराव असतो.हातात दिंडन घेऊन बासरी,मांडूल ,ताठ यांच्या तालावर ते गेर दिंडनच्या नऊ चाली असतात सध्या सहभागी झालेले युवक व प्रौढवयीन पुरूष ज्या गावत नृत्य असेल तेथेच मुक्काम करावा लागणार आहे. या काळात ते नृत्यासाठी आलेले युवक व प्रौढ आंघोळ करत नाहीत .केवळ ते स्वतःचे ओठ आणि डोळे ओले करू शकतात. स्री सहवास टाळवा लागतो ,पायात चप्पल न घालणे,पाणी न ओलांडाणे आदी कडक नियम त्यांना पाळावे लागतात. यावेळी आलिविहीर गावाचे कारभारी उमेदसिंग बटेसिंग पाडवी, जगतसिंग गटवरसिंग पाडवी, प्रेमराज सुमेरसिंग पाडवी हे दरवर्षी नृत्याचे आयोजन करतात. यावेळी गेर दिंडन नृत्याच्या या कार्यक्रमाची पाहण्यासाठी जिल्ह्य़ातील मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी उपस्थिती .
असा असेल पुढील गेर डिंडन
१९ मार्च आलिविहीर, २०मार्च मौलीपाडा (ता.अक्कलकुवा ),२१ मार्च रतनपाडा (ता.तळोदा ), २२ मार्च नाला ( ता.अक्कलकुवा ),२३मार्च रामपूर, २४ मार्च मोदलपाडा, २५मार्च शिरवे ता.तळोदा ,२६ मार्च गणेश बुधावल असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.








