Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोजंदारीचे अनुभव गुण न दिल्यामुळे नाशिक आदिवासी अप्पर आयुक्त यांच्यासह इतरांना न्यायालयाने दिली नोटीस

team by team
March 19, 2022
in क्राईम
0
रोजंदारीचे अनुभव  गुण न दिल्यामुळे नाशिक आदिवासी अप्पर आयुक्त यांच्यासह इतरांना न्यायालयाने दिली नोटीस

नंदुरबार l प्रतिनिधी
अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, यांनी कार्यक्षेत्रातील प्रकल्पांतर्गत असलेल्या अनुसूचित क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळांमध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरिता स्थानिक उमेदवारांमधून शिक्षण सेवक संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी जाहिरात दिली होती. महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, यांनी आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृहामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन निर्णय पारित केला होता. संबंधित पदावरील अनुभव गुण देण्याची तरतूद केली होती. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा, जिल्हा नंदुरबार यांनी अनुभव प्रमाणपत्र ही दिले होते. माध्यमिक शिक्षक या पदासाठी संभाव्य निवड यादी मध्ये याचिकाकर्ते यांना रोजंदारीचे अनुभव गुण देण्यात आले होते परंतु अंतिम निवड यादीमध्ये गुण देण्यात आले नाही. म्हणून याचिकाकर्ते वेश्या लसमा वसावे व इतर रा. अक्कलकुवा यांनी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, व इतर यांच्याविरुद्ध शासन निर्णय प्रमाणे रोजंदारीचे अनुभव गुण न दिल्यामुळे माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक ३०४४/२०२२ ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. वि. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे) यांनी दि.२ मार्च २०२२ रोजीच्या आदेशान्वये प्रतिवादी यांना नोटीस बजावण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. गजेंद्र देवीचं जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या 47 गुन्हे दाखल, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सुजलाॅन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान, गिरगाय ठार तर बैल जखमी

Next Post
सुजलाॅन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान, गिरगाय ठार तर बैल जखमी

सुजलाॅन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान, गिरगाय ठार तर बैल जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add