Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘मुहंमद’चित्रपटावर बंदी;मात्र‘द कश्मीर फाइल्स’करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष : हिंदु जनजागृती समिती

team by team
March 17, 2022
in क्राईम
0
‘मुहंमद’चित्रपटावर बंदी;मात्र‘द कश्मीर फाइल्स’करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष : हिंदु जनजागृती समिती

नंदुरबार l प्रतिनिधी
रझा अकादमीच्या सांगण्यावरून ‘मुहंमद’चित्रपटावर बंदी;मात्र‘द कश्मीर फाइल्स’करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष,हा कोणता ‘राष्ट्र’वाद आहे असा सवाल होतो.हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील धनवट यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रात म्हटले आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याच्या संदर्भात विधीमंडळात निवेदन करतांना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेले वक्तव्य हिंदूंप्रतीची असंवेदनशीलता व्यक्त करणारे आहे.देशभरात प्रचंड प्रमाणात गाजत असलेला द काश्मीर फाईल्स हा चित्रपट वर्ष 1990 मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि वर्ष 1947 च्या भारताच्या फाळणीविषयी,हेच राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत नसणे,हे दुर्दैवी आहे.वर्ष 1947 मधील फाळणीच्या वेळी झालेल्या पाकिस्तानातील शीख आणि हिंदू यांच्या विस्थापनालाही त्यांनी ‘इकडून तिकडून येणे-जाणे झाले’,असे सहज म्हणणे,हे गृहमंत्री असणार्‍या व्यक्तीला शोभत नाही.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुरुंगात असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जुलै 2020 मध्ये ‘मुहंमद:द मेसेंजर ऑफ गॉड’ या इराणी चित्रपटावर दंगेखोर म्हणून ओळखल्या जाणार्‍या रझा अकादमीच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात बंदी घातली होती.एका संघटनेच्या मागणीवरून चित्रपट न पहाताच‘मुहंमद’या चित्रपटावर तत्परतेने बंदी घालणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहखाते काश्मिरी हिंदूंवर पाकिस्तान पुरस्कृत आतांकवाद्यांनी केलेल्या अत्याचारांचे,तसेच हिंदू समाजाच्या वंशसंहाराचे सत्य मांडणारा द कश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करते.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा कोणता ‘राष्ट्र’वाद आहे,हा प्रश्न निर्माण होतो.हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील धनवट यांनी केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दारूच्या नशेत ११२ डायल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार पालिकेच्या करवसुली आढावा बैठकीस गैरकायदेशिर व्यक्तीची उपस्थिती प्रकरणीप्रभारी नगराध्यक्ष यांना अपात्र करा : निलेश पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add