Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भूमिहिन आदिवासी बांधवांनी सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

team by team
March 16, 2022
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
भूमिहिन दारिद्ररेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्ररेषेखालील भूमिहिन कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) देण्यात येणार आहे. ही योजना आदिवासी विकास विभागातर्फे 100 टक्के अनुदानित आहे. नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील पात्र भूमिहिन आदिवासी लाभार्थ्यांनी व जमीन मालकांने या योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत निवडावयाच्या लाभार्थ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणारे घटक असे : दारिद्ररेषेखालील भूमिहिन आदिवासी परितक्त्या स्त्रिया, दारिद्ररेषेखालील भूमिहिन आदिवासी विधवा स्त्रिया, भूमिहिन कुमारी माता, भूमिहिन आदिम जमाती, भूमिहिन पारधी. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र (ग्रामसेवकाचे), लाभार्थ्याचे वय किमान 18 व कमाल 60 वर्षे असावे, लाभार्थी त्या गावाचा रहिवासी असावा (सरपंच व ग्रामसेवकांचा एकत्रित दाखला), दारिद्ररेषेखालील यादीमध्ये त्याच्या नावाची नोंद असावी, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला.

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी,जमीन मालकाने सातबारा व 8-अ, कागदपत्र जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. दारिद्ररेषेखालील पात्र भूमिहिन आदिवासी लाभार्थ्यांनी व जमीन मालकाने 17 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार कार्यालयाकडून अर्ज वाटप करण्यात येईल.परिपूर्ण अर्ज भरुन 28 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार रेशनवर साखर

Next Post

भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add