Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 2 हजार 965 खटले निकाली : 5 कोटी 25 लाख 17 हजार 627 महसूल जमा

team by team
March 12, 2022
in क्राईम
0
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 2 हजार 965 खटले निकाली : 5 कोटी 25 लाख 17 हजार 627 महसूल जमा

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार व तालुकास्तरावर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या.ए.एस.भागवत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. डि. व्ही. हरणे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. एस. टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. व्ही. जी. चव्हाण, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या.आर.एन.गायकवाड,कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्या.श्रीमती. वाय.के.राऊत, कनिष्ठ स्तर दुसरे सह दिवाणी न्या.एन.बी.पाटील,जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. के.एस.सावळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये आज निकाली निघालेल्या दिवाणी प्रकरणात बँक वसुली, मोटार अपघात, चलनक्षम धनादेश, कौटूंबिक वाद, इतर किरकोळ फौजदारी व दिवाणी अशा एकुण 677 निकाली प्रकरणात 3 कोटी 25 लाख 39 हजार 714 रुपये वसुल करण्यात आले.
तर जिल्हयातील एकुण दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुली, वीज थकबाकी वसुली, पाणीपट्टी, घरपट्टीच्या थकबाकी वसुली, किरकोळ प्रकरणे,बी.एस.एन.एल अशी एकूण 2 हजार 288 प्रकरणे निकाली काढण्यात येवून 1 कोटी 99 लाख 77 हजार 913 रुपये वसुल करण्यात आले. असे दोन्ही मिळून दाखल प्रकरणात 2 हजार 965 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढून 5 कोटी 25लाख 17 हजार 627 रुपये वसुल करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मनोमिलन झालेल्या जोडप्यांचा सत्कारही मान्य्वराच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरुपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाशी संबंधित असणारी प्रलंबित प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. तर दाखलपुर्वक प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तडजोडक्षम प्रकरणे, बँक कर्ज, पाणीपट्टी, दूरध्वनीदेयक, वीजबिल इत्यादी थकबाकी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. नागरिकांना या लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित वाद तडजोडीने मिटविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे दोन्ही पक्षांचा वेळेची व पैशाची बचत झाली. तसेच मानसिक त्रासही न होता समाधान मिळाले.
पॅनल प्रमुखाच्या मदतीसाठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, ॲड.एस.ए.कुलकर्णी, ॲड.एस.के. पाटील, ॲड. डी.डी .पाटील, ॲड.हितेंद्र राजपूत, ॲड.आर.एम.चौधरी, ॲड.शारदा पवार, पी.डी.बोरसे, एच.एम.गांगुर्डे, यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पाहिले. तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक एच.व्हीी.जोशी, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.कमलाकर सावळे,जिल्हाा विधी सेवा प्राधिकरणच्याच अधीक्षक जया ताडगे, न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

उसाच्या शेतात लागल्याने आगीत 12 एकरांतील ऊस जळून खाक

Next Post

रायसिंगपुऱ्यात विकासकामाचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
रायसिंगपुऱ्यात विकासकामाचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

रायसिंगपुऱ्यात विकासकामाचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add