Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रात्री १ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन मिळाल्याने सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे आंदोलन स्थगित

team by team
March 11, 2022
in राजकीय
0
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे बिऱ्हाड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,रात्री मोर्चेकऱ्यांचा ठोकला मुक्काम

नंदुरबार | प्रतिनिधी
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने वनहक्क कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसह विविध मागण्यांसाठी विसरवाडीहून ४० किमी.पायीमोर्चा नेत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर बिर्‍हाड आंदोलन करण्यात आले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली.दरम्यान रात्री १ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन मिळाल्याने अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या हजारो कार्यकर्त्यांनी वन दावेदारांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.त्यात प्रशासन त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत विसरवाडीहून पायीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.दिवसभर कडाक्याच्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या सुरूच होता.सायंकाळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सत्यशोधकच्या शिष्टमंडळाशी विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर सुरुवातीला लेखी आश्वासन देण्यात आले.मात्र त्यात त्रुटी आढळल्याने सत्यशोधकच्या शिष्टमंडळाने सदरचे लेखी आश्वासन नकार दिला.यामुळे त्यात दुरूस्ती करुन पुन्हा नव्याने रात्री १ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची स्वाक्षरी असलेले लेखी आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्याहस्ते देण्यात आले.लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. लेखी आश्वासनात सत्यशोधकच्या विविध मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील व मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्यात येतील असे म्हटले आहे.यावेळी रामसिंग गावित, जगन गावित, होमाबाई गावित, किशोर ढमाले, दिलीप गावित, रणजित गावित, रामा गावित, नकट्या गावित, जोत्या गावित, शितल गावित, जेठा गावित, कांतीलाल गावित, विक्रम गावित, साजूबाई गावित, सिंगा वळवी, मंगा गावित, रमेश गावित, उत्तम गावित, रंग्या कोकणी, भिलक्या गावित, शितल गावित, जेवाबाई गावित, हिरामण महाले, जेत्या गावित आदींसह हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात या व्यवसायासाठी१०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची दिली परवानगी.

Next Post

पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add