Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात या व्यवसायासाठी१०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची दिली परवानगी.

team by team
March 11, 2022
in राज्य
0
नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील चित्रपटगृहे, सिनेमा हॉल, नाटयगृहे १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परवानगी दिली असल्याचे आदेश आज काढण्यात आले.
या आदेशात म्हटले आहे कि, राज्यात कोविड विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव पाहता सर्वत्र कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत असल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने संपूर्ण राज्यासाठी प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले आहेत. मागील दोन वर्षापासून कोव्हिड -१९ मुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे चित्रपटगृहे, सिनेमा हॉल नाटयगृहे बंद असल्याने तसेच सद्यस्थितीत ५० टक्के क्षमतेने सुरू असल्याने सदर व्यावसायिकांना मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी चित्रपटगृहे, सिनेमा हॉल ( मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रिन सह ) , नाट्यगृहे यांच्या वेळेत वाढ होवून मिळणेबाबत तसेच १०० टक्के क्षमतेने नियमितपणे सुरू करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत १८ वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ७४.७१ टक्के लसीचा पहिला डोस व ४९.०७ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे . जिल्हयात आज रोजी कोव्हिड -१९ चे एकूण १४ रूग्ण आहेत . सर्व रुग्णांना सौम्यस्वरूपाचे लक्षणे असल्याने वैद्यकीय देखरेख खाली गृह अलगीकरण करण्यात आले आहे . जिल्हयांचा दरदिवसाचा पॉझीटीव्हीटी दर १० टक्के पेक्षा कमी आहे आणि रिकव्हरी रेट ९८ टक्के आहे . आजच्या दिवसाला रूग्णालयात एक ही कोव्हिड -१९ चा बाधित रूग्ण दाखल नाही . यास्तव जिल्हयातील उक्त आस्थापना यांना चालना मिळणेसाठी त्यांच्यावरील निर्बंध शिथिल करणे आवश्यक आहे.त्यामुळे नंदुरबार उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व चित्रपटगृहे, सिनेमा हॉल ( मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रिन सह ) , नाटयगृहे , हे ५० टक्के क्षमतेऐवजी १०० टक्के क्षमतेने नियमित वेळेनूसार सुरू ठेवण्यासाठी याद्वारे मुभा, सुट देण्याबाबत आदेशित करीत आहे .
केंद्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश , सूचना , अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल . कोविड -१९ साथरोग संदर्भाने शासनाचे आदेश , जिल्हा प्रशासनाचे आदेशांमधील अटी , शर्ती , दंडाबाबत निर्देशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती , आस्थापना व शासकीय निमशासकीय विभागांना बंधनकारक पालन करणे सक्तीचे असेल असे जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा खत्री यांनी आदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

रात्री १ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन मिळाल्याने सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे आंदोलन स्थगित

Next Post
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे बिऱ्हाड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,रात्री मोर्चेकऱ्यांचा ठोकला मुक्काम

रात्री १ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन मिळाल्याने सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add