Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ५५३ क्विंटल तांदूळसह दोन ट्रक जप्त

team by team
March 5, 2022
in क्राईम
0
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील धुळे चौफुलीकडून गुजरात राज्यातील अहमदाबाद व वडोदरा येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ५५३ क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला आहे.तांदूळाची वाहतूक करणाऱ्या दोन्ही ट्रकसह २८ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेकडो क्विंटल तांदूळाची धुळे चौफुली परिसरातून गुजरात राज्याकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, तांदूळाची वाहतूक करणारा ट्रक क्र.(एमएच २३ एयू ५५५६)धुळे चौफुलीजवळ आले असता सदरचे वाहन अडविण्यात आले.वाहनाची तपासणी केली असता त्यात ५ लाख १३ हजार ३६५ रुपये किंमतीचे ५०० गोण्यांमध्ये २५० क्विंटल तांदूळ आढळून आला.सदरच्या गोण्यांवर काहीही लिहिलेले किंवा छापलेले दिसून आले नाही.दरम्यान वाहनातील दोघांकडून सादर करण्यात आलेली बिले हस्तलिखित व संशयास्पद असल्याने सदरचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे संशयावरुन वाहनासह जप्त करण्यात आला.तसेच ट्रक क्र.(एमएच १६ एवाय ६४६७) हे वाहन अडवून तपासणी केली असता त्यातदेखील ५०६ गोण्यांमध्ये ५ लाख २८ हजार ७७० रुपये किंमतीचा सुमारे २५३ क्विंटल तांदूळ आढळून आला.दरम्यान, वाहनचालक सुलेमान अजमखान याने सादर केलेली ई-वे बिलात नमूद वेळ व नंदुरबारसाठी येण्याचा वेळ यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली.यामुळे सदरचा तांदूळ हा अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन वाहनासह ताब्यात घेण्यात आला आहे.दोन्ही वाहनातील १० लाख ४२ हजार १३५ रुपयांचा ५५३ क्विंटल तांदूळ व १८ लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे २८ लाख ४२ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत नंदुरबार तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हर्षद छगन नेरकर यांच्या फिर्यादीवरुन वाहनचालक दिलीप शिवाजी ढेंगे व नारायण चंद्रसिंग गाडे (दोन्ही रा.मोहजवाडी ता.बीड) व दुसऱ्या वाहनातील सुलेमान अजमखान (रा.नवापूरा, औरंगाबाद)या तिघा संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

धर्मादाय कार्यालयातर्फे 14 मार्च पासून विशेष मोहीम

Next Post

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने लाववेल्या एक्झिट एक्झाम टेस्ट विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add