Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘जाहिरनामा अभिमान’ अभियान, विद्यार्थी सबलीकरण उपाययोजना, रोजगाराच्या संकल्पना मांडणार

team by team
February 22, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘जाहिरनामा अभिमान’ अभियान, विद्यार्थी सबलीकरण उपाययोजना, रोजगाराच्या संकल्पना मांडणार

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या जाहिरनामा अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ठोस धोरणे व नाविन्यपूर्ण योजना तयार करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे. विद्यार्थी सबलीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय योजना व रोजगार आधारित शिक्षणाच्या संकल्पना याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून करण्यात येणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्या राज्यात महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या पोट निवडणूकसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करत आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही यासाठी पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून नंदूरबार जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे ह्यांच्या मार्गदर्शन खाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अँड.राऊ दिलीपराव मोरे यांच्या सहकार्याने विद्यार्थी काँग्रेस जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात आणि प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांचा जाहीरनामा हा उपक्रम राबवणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे गरजेचे

विद्यार्थी महत्वपूर्ण घटक आहे. आजचा सुदृढ विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक बनतो व तो राज्याचा व देशाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ठोस धोरणे व नाविन्यपूर्ण योजना तयार करून आपल्या महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे गरजेचे आहे.हाच विचार समोर ठेवून विद्यार्थी सबलीकरणासाठी आवश्यक असणाच्या उपाययोजना, रोजगार आधारित शिक्षणाच्या संकल्पना, राज्यातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला सुलभतेने शिक्षण मिळण्याची प्रक्रिया, त्यासंबंधीच्या योजना अश्या अनेक बाबींवर काम करणे गरजेचे आहे.त्या अनुषंगानेच महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही विद्यार्थ्यांचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करणार असल्याचे म्हटले आहे.

जाहीरनामा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अंमलबजावणी

जाहीरनामा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे, पदाधिकारी विद्यार्थी- युवक कल्याण, ग्रामीण व शहरी विकास, शिक्षण, उद्योजकता, रोजगार आदी विषयात काम करणारी तज्ञ मंडळी, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, साहित्यिक, प्रशासक, व्यवसायिक व इतर मान्यवरांशी चर्चा करून मार्गदर्शन घेणार आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाकडून व त्यांच्या पालकांकडून सूचना मागविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

सूचनांचे एकत्रीकरना नंतर जाहीरनामा

अभियानाच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून पक्षाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहरासाठी विद्यार्थ्यांप्रती एक स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्या आणि शहरामधून आलेल्या सूचना विद्यार्थी प्रदेश कार्यालयाला पाठवून राज्यभरातून आलेल्या सूचनांचे एकत्रीत करून राज्यासाठीचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे.

बबलु कदमबाड़े
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

बातमी शेअर करा
Previous Post

अवैधरित्या दारुविक्री करणार्‍या इसमास न्यायालयाने ठोठावली ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

खा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर, २६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण

Next Post
खा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर, २६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण

खा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर, २६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add