Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावर्‍या दिगर पुलाच्या अर्धवट कामाचा जाब विचारण्यासाठी नागरिकांचा धडगाव तहसील कार्यालयाला घेराव, १० मार्चला जलसमाधीचा इशारा

team by team
February 22, 2022
in राजकीय
0
सावर्‍या दिगर पुलाच्या अर्धवट कामाचा जाब विचारण्यासाठी नागरिकांचा धडगाव तहसील कार्यालयाला घेराव, १० मार्चला जलसमाधीचा इशारा

नंदुरबार | प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या नर्मदा नदीच्या बॅकवॉटर वरील सावर्‍या दिगर पुलाच्या अर्धवट कामाचा जाब विचारण्यासाठी नागरिकांचा धडगाव तहसील कार्यालयाला घेराव घातला.दरम्यान २ मार्चला नर्मदा विकास प्राधिकरणसह सर्व संबंधित अधिकारी माहिती देण्याचे आश्वासन यावेळी गावकर्‍यांना देण्यात आले.अर्धवट पुलाचे बांधकाम सुरू न झाल्यास १० मार्चला नागरिकांकडून जलसमाधीचा इशारा यावेळी गावकर्‍यांतर्फे निवदनाव्दारे देण्यात आला.
धडगाव तालुक्यातील सावर्‍या दिगर, भमाना, वरवाली, सादरी, भाबरी उडद्या, भादल या गावांना जाण्यासाठी नर्मदा नदीवरील बॅकवॉटर मुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे २००५ साली भिंगारे समितीच्या सर्वेक्षणातून या गावांचे पुनर्वसन न करता नदीवर पूल बांधून दिल्यास दळणवळणाची सोय होईल असे सुचविण्यात आले होते त्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापूर्वी सावर्‍या दिगर पुलाच्या कामाला सुरुवात झाली खरी परंतु २०२२ उजाडल्यानंतर ही हे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण होते.सदर पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी नागरिकांकडून आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून धडगाव तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला. याबाबत प्रशासनाला जाब विचारल्यानंतर २ मार्च रोजी नर्मदा विकास प्राधिकरण सह संबंधित सर्व अधिकार्‍यांची पुलाच्या ठिकाणी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले यानंतर पुन्हा स्थानिक नागरिकांनी आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन योग्य तोडगा न निघाल्यास दहा मार्च रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव तहसिल कार्यालयाच्या बाहेर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समावेश

Next Post
नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समावेश

नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add