Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती साफसफाई करण्याची मागणी : ॲड.रुपसिंग वसावे

team by team
February 15, 2022
in सामाजिक
0
अक्कलकुवा शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती साफसफाई करण्याची मागणी : ॲड.रुपसिंग वसावे

अक्कलकुवा l प्रतिनिधी
‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, अक्कलकुवा शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.
स्वच्छतेवर किती खर्च होतो? मात्र, अक्कलकुवा शहरात निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.
देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते.
याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायत असलेल्या या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटारं देखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. तर काही नागरिकांनी सांडपाण्यासाठी असलेले शोषखड्डे देखील बुजवून घेतल्याने हे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारे साचली आहेत, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. आधीच कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे, तर आता जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने या घाणीचे साम्राज्या परसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे अक्कलकुवा शहरातील शीख गल्लीच्या रस्त्यावर तात्काळ साफसफाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्यार्थ्यांनीच केली शाळेत चोरी : पानबारा आश्रमशाळेतील लॅपटॉप चोरीचा गुन्हा अवघ्या ४८ तासात उघड, विसरवाडी पोलीसांनी २२ लॅपटॉप हस्तगत करीत एकासह ५ विधीसंघर्ष बालकांना घेतले ताब्यात

Next Post

सुझलॉन टॉवरवर दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असणाऱ्या हट्टी येथील चौघांना नंदुरबार तालुका पोलीसांनी केली अटक,एक जण फरार, एअर गन, तलवारसह साहित्य केले जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add