Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेशिवाय पर्याय नाही; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
February 13, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेशिवाय पर्याय नाही; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

तळोदा l प्रतिनिधी
शिवसेनेची दखल घेतल्याशिवाय शहरातील राजकारण होऊ शकत नाही.धडगावपासून शिवसेनेच्या विजयी रथाची घोडदौड सुरू झालेली असून, भविष्यात जिल्ह्यातील राजकारणातील सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती असतील. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय पक्षांना शिवसेनेची नोंद घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा आत्मविश्वास असा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.

शहरातील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात हिंदू हृदय  सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी रघुवंशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.  स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शेर शाखेतर्फे गरजूंना भेटवस्तू वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आ.रघुवंशी म्हणाले,शिवसेना पक्ष वाढला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजेत. सर्वत्र गढूळ राजकारण सध्या सुरू आहे. भाजपचे नेते उठून सुटून शिवसेनेवर आरोप करत आहेत. त्या आरोपांना शिवसेनेचे नेते संजय राऊत चोख प्रत्युत्तर देत आहेत.शिवसेनेच्या बदनामीसाठी भारतीय जनता पार्टीने किरीट सोमय्या यांची नेमणूक केली आहे. ते उठ सूट कोणावरही आरोप करीत सुटले आहेत. त्यांनी केलेले आरोप अजून पर्यंत सिद्ध झालेले नाहीत. खोट्यानाट्या आरोपांमुळे राजकारणात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना बदनामी सहन करावे लागत आहे.
कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी,जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हा संघटक राम वाडीले,युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाट,नगरसेविका प्रतीक्षा दुबे,महिला बालकल्याण समिती सभापती सुनयना उदासी, माजी नगरसेवक सुनिल सोनार,शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद चौधरी,सोनार सोसायटीचे अध्यक्ष घनश्याम सोनार,सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद सराफ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल,माजी नगरसेविका कोमल सोनार,शहर संघटक विनोद वंजारी, उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, युवा सेना तालुका अधिकारी कल्पेश माळी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, सुरज माळी,अमन ठाकरे,हरीश पाटील,विजय मराठे उपस्थित होते.
संकटसमयी शिवसेनाच
कोरोना महामारी संकटाच्या काळात शिवसैनिक रस्त्यावर उभे राहून नागरिकांना मदत करीत होते. शहरात ज्या-ज्या वेळी संकट आली त्यावेळी नागरिकांच्या मागे केवळ शिवसेनेचेच धावून आल्याचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापाडा येथे धनंजय गावित व अमरसिंग गावित यांच्या हस्ते सुमाणिक ग्रामिण क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ

Next Post

विद्यापीठ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात राज्यात १ कोटी स्वाक्षरी मोहिमेसह मंत्रालयावर धडक मोर्चाचा प्रस्ताव पारीत, अभाविपच्या ५६ व्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add