सारंगखेडा l प्रतिनिधी
तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी संसदेमध्ये सातत्याने मागणी करत चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे घर धूरमुक्त घर व्हावे यासाठी उज्ज्वला गॅस योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून जिल्हयातील एक लाख महिलांना गॅस जोडणी देण्यात येणार आहे.दरम्यान बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर हा मार्ग चौपदरीकरणासाठी मंजूर झाला असून दोन महिन्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे . असल्याचे प्रतिपादन खा.डॉ . हिना गावीत यांनी केले .
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील दत्त मंदिर सभागृहात प्रधानमंत्री उज्वला २ योजनेतंर्गत गॅसची शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या . कार्यक्रमात आमदार डॉ . विजयकुमार गावीत , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल , जिल्हा परिषद सदस्या डॉ . सुप्रिया गावीत , जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल , पंचायत समिती सदस्या रत्ना पवार ,सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , कोठलीचे सरपंच राहूल पाटील , देवेंद्र बोरसे , उपसरपंच अनिता न्हानभो भील , देऊरचे सरपंच रेखा गिरासे , वासुदेव पाटील , नारायण सामुद्रे , संजय भदाणे , सुभान पाटील , संतोष मोरे , ग्रामसेवक श्री . चव्हाण , दिपिका ठाकरे आदी उपस्थित होते . पुढे बोलतांना खा . गावीत म्हणाल्या की , उज्वला योजना बंद झाली होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेबाबत व जिल्ह्यात अनेक महिलां या योजने पासून वंचित आहेत . म्हणून ही योजना प्रधानमंत्री उज्वला २ नावाने पुन्हा सुरू करण्यात आली जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल . तसेच बचत गटातून महिलांना स्वयंम रोजगार उपलब्ध व्हावा . महिला सक्षम व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहेत . महिलांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी आणि सन्मानासाठी शासनाचे अनेक योजना सुरू केल्या आहेत . त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली . हर घर नल हर घर जल योजनतंर्गत जिल्हयातील गावाचा प्रत्येकांचा घरात नळाद्वारे शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे .केंद्रातर्गत या योजनेचे कामे अनेक गावांमध्ये सुरू झाले आहे . तसेच बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर हा मार्ग चौपदरीकरणासाठी मंजूर झाला असून दोन महिन्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे . शहादा . दोंडाईचा रस्त्यालाही मंजूर मिळाली असून तत्काल रस्त्यावरील खड्डयांची डागडूगी करण्यासाठी निधी मंजूर केली आहे . यावेळी आ .डॉ . गावीत , जयपाल रावल , सुप्रिया गावीत यांनी मनोगत व्यक्त केले .देऊर , टेंभा , बिलाडी , कोठली , कळंबू , अनरद येथील ३५० लाभार्थी उपस्थित होते . सुत्रसंचालन पी .टी. पाटील यांनी केले तर आभार निलेश पाटील यांनी केले .








