Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बीडीएस प्रणाली सुरू करा: प्रहार शिक्षक संघटनेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

team by team
February 10, 2022
in शैक्षणिक
0
बीडीएस प्रणाली सुरू करा: प्रहार शिक्षक संघटनेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
जीपीएफमधील हक्काचा पैसा वापरण्यासाठी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जीपीएफ खात्यांमधील काही रक्कम काढण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र तब्बल ४ महिन्यांपासून जीपीएफचा शालार्थ टॅब बंद असल्याने शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव पडून आहेत . नोव्हेंबरपासून भविष्य निर्वाह निधीचा एकही प्रस्ताव निकाली न निघाल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. या पैशांच्या भरोशावर केलेले नियोजनही विस्कटले आहे. शासनाने बीडीएस प्रणाली सुरू करून कर्मचाऱ्यांची हक्काची रक्कम त्यांना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रहार प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनाच ई-मेल द्वारे साकडे घातले आहे.ई-मेलची प्रत मुख्य सचिव वित्त विभाग मुंबई, शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू, राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना प्रहार प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी दिलेल्या निवेदनात वित्त विभागाला आदेशीत करून भाविष्य निर्वाह निधीचा टॅब बी.डी.एस.साठी त्वरित उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या दर महिन्याच्या वेतनातून जीपीएफची ठरावीक रक्कम आपल्या जीपीएफ खात्यात जमा करीत असतात. अत्यंत आवश्यकता असतांना किंवा सेवानिवृत्त होतेवेळी ही रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येते. अनेकांनी मुला मुलींचे लग्न, घराचे बांधकाम व इतर कामांसाठी घर, प्लॉटखरेदी करून आपले प्रस्ताव पाठविले आहेत. गत ४ महिन्यांपासून ते मंजूर झालेले नाही. म्हणून कर्मचारी अडचणीत आले आहे. पैशाची नितांत गरज असताना भविष्य निर्वाह निधीच्या हक्काचा पैसा गरजेच्या वेळी मिळत नसल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जीपीएफ प्रकरण कर्मचारी यांना मंजूर करावयाचे असल्यास शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तो जि.प. वित्त विभागाकडे जातो. तेथून मंजूर झाल्यावर कोषागार कार्यालयात पाठविले जात होते. तेथून मंजूरीनंतर कर्मचारी यांच्या खात्यात जमा होते. सध्या बी.डी.एस. निघणे बंद असल्याने जीपीएफ प्रकरण शिक्षणाधिकारी, वित्त विभाग लेखाधिकारी यांची मंजुरी घेऊन पडून आहेत. त्यामुळे शिक्षक व कर्मचारी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत.बीडीएस प्रणाली सुरू झाल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबाची आर्थिक संकटातून सुटका होईल.

बातमी शेअर करा
Previous Post

50 टक्के वीजबिल माफीचा लाभ घेण्यासाठी उरले 50 दिवस

Next Post

महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या नंदूरबार जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास प्रभाकर चौधरी यांनी निवड

Next Post
महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या नंदूरबार जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास प्रभाकर चौधरी यांनी निवड

महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या नंदूरबार जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास प्रभाकर चौधरी यांनी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add