Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘कोविड- 19’ मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी पोर्टलवर अर्ज सादर करावेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

team by team
December 4, 2021
in आरोग्य
0
रूमाल मास्क म्हणून वापराल तर बसेल दंड, नंदूरबार जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची जाहीर केली नियमावली

नंदूरबार l प्रतिनिधी

 ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

‘कोविड- 19’ या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह साहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाइन वेबपोर्टल विकसित केले असून ‘कोविड- 19’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास सानुग्रह साहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी कमीतकमी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगइन करणे आवश्यक राहील. तसेच https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळण्यासाठी लॉग इन करता येईल. केंद्र सरकारकडे ज्यांच्या ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी ‘कोविड- 19’ मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल, तर ‘कोविड 19’ मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णयान्वये, जिल्हास्तरावर तक्रार गठित तक्रार निवारण करण्यात आलेल्या तक्रार निवारण  समिती सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक,नंदुरबार यांचेकडे अपील करता येईल. या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेवून अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह साहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरीता वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील. जेणे करून मृत व्यक्तीच्या योग्य वारसास साहाय्य मिळावे या करीता त्याला अपील करण्याची संधी मिळू शकेल.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह साहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्मित हॉस्पीटल व रोटरी नंदनगरीतर्फे २०० विद्युत कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

Next Post

विसरवाडीत येथे घराला आग लागुन लाखोंचे साहित्य जळून खाक

Next Post
विसरवाडीत येथे घराला आग लागुन  लाखोंचे साहित्य जळून खाक

विसरवाडीत येथे घराला आग लागुन लाखोंचे साहित्य जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add