Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

team by team
June 16, 2026
in शैक्षणिक
0
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी-

भालेर येथील का. वि. प्र. संस्था संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात, आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक  पी. पी. बागुल, भालेरच्या मा.सरपंच प्रा. कविता  पाटील, ज्येष्ठ पत्रकार  शांताराम  पाटील, बाबुलाल  पाटील, महेंद्र  भोसले, ईश्वर  मराठे, प्राचार्य  पी. एस. सूर्यवंशी तसेच पर्यवेक्षक  पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, संस्कार, गुणवत्तापूर्ण अध्ययन आणि उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम करण्याचे आवाहन केले.
प्रवेश उत्सवानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.

विद्यार्थ्यांच्या पहिल्या शालेय दिवसाच्या आठवणी कायमस्वरूपी जतन व्हाव्यात यासाठी विद्यालयाच्या वतीने आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या पालक, शिक्षक व मित्रांसोबत छायाचित्रे काढून या संस्मरणीय दिवसाचा आनंद द्विगुणित केला.
पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यालयात विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी वृक्षारोपण, जलसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. “हरित शाळा – सुंदर भविष्य” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

तसेच नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

Next Post
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add