वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप
नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र शासनाचा राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात नाव नोंदणी व तपासणी पूर्ण झालेल्या 1 हजार 4 पात्र ज्येष्ठ नागरिकांना लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणांचे वाटप शिवसेना नेते आ.चंद्रकांत रघुवंशी खा.गोवाल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
नंदुरबार येथील यशवंत विद्यालयाचा मैदानात केंद्र शासनाचा राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत एलिंको व आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,सौ.मेघा रघुवंशी,शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,जि.प माजी सभापती विक्रमसिंह वळवी,शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,बाजार समिती सभापती दीपक मराठे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक कुणाल वसावे, गजेंद्र शिंपी,मनीषा गिरासे,सोनिया राजपूत, हर्षदा नेरे,राऊ मोरे,भरत चौधरी,बाजार समिती संचालक किशोर पाटील,मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश पाटील,एलीमकोचे डॉ.किरण पावरा आदी उपस्थित होते.
घडीचे वॉकर,श्रवण यंत्र, चालण्याची काठी, चष्मा कमोड खुर्ची, चाकांची घडीची खुर्ची, कंबर आणि गुडघ्याच्या पट्टा तसेच इतर सहाय्यक उपकरणांचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. सहाय्यक उपकरण मिळाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले. साहित्य घेण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील नागरिक सकाळपासूनच उपस्थित होते. दुपारपर्यंत वाटपाचे काम सुरूच होते.
नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,मेघा रघुवंशी यांनी देखील वयोवृद्धांना सहाय्य केले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते. ग्रामीण भागातून आलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना कार्यक्रम स्थळापर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्ते व्यस्त होते.








