Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा प्रशासनाच्या बहुभाषिक खिसा पुस्तिकाचे भव्य प्रकाशन,राजभाषेसह थानिक बोली भाषांना प्रोत्साहन देणारा ऐतिहासिक उपक्रम

team by team
January 29, 2025
in राजकीय
0
जिल्हा प्रशासनाच्या बहुभाषिक खिसा पुस्तिकाचे भव्य प्रकाशन,राजभाषेसह थानिक बोली भाषांना प्रोत्साहन देणारा ऐतिहासिक उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्हा प्रशासनाने राजभाषा मराठीसह स्थानिक बोली भाषांना प्रोत्साहन देत प्रशासन आणि लोकांमधील संवाद अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’ तयार करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले.

नियोजन भवन येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याला खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., सहाय्यक जिल्हाधिकारी, अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच जिल्हा नियोजन समिती चे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखीलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲड. राम रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागातील स्थानिक बोली भाषांतील जाणकार शिक्षकांच्या सहकार्याने तयार झालेल्या या पुस्तकात इंग्रजी, मराठी, पावरा, भिली आणि वसावे या पाच भाषांचा समावेश आहे. प्रशासन व स्थानिक समुदाय यांच्यातील संवाद अधिक सुगम करण्यासाठी हे पुस्तिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या खिसा पुस्तिकेत सामान्य, सुविधांची सुलभता, अंगणवाडी, शाळा, कृषी, स्वयं-सहाय्यता गट (SHG) आणि वनहक्क कायदा (FRA) यांसारख्या सात महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाशी संबंधित माहितीचा समावेश आहे. यामध्ये एकूण १४२ प्रश्न असून, जे प्रश्न स्थानिक भाषेत प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारले जाऊ शकतात. यामुळे प्रशासनाला तळागाळातील समस्या समजून घेऊन उपाययोजना करण्यास मदत होईल.

यावेळी बोलताना पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले, “बहुभाषिक खिसा पुस्तिका ’ हा एक अभूतपूर्व उपक्रम आहे. हा उपक्रम केवळ संवाद वाढवण्यापुरता मर्यादित नाही, तर प्रशासन आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, “भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. या पुस्तिकेमुळे तळागाळातील व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर कार्यवाही करणे सोपे होईल.”

हा उपक्रम अधिक स्थानिक आदिवासी बोली भाषांमध्ये संसाधन विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’मुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन अधिक सुसंवादी व प्रगत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून जिल्ह्यातील सर्व संबंधित याला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.

या पुस्तिकेच्या निर्मितीत उपअधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण, रणधीर भामरे, दिलीप पावरा, ईश्वर गावित, अमरदास नाईक तसेच आकांक्षित जिल्हा फेलो कु. अस्मिता गुडधे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री आशापुरी माता फाउंडेशन तर्फे विनय विहार येथे ई -कचरा संकलन

Next Post

जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहीमेची पालमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात, 8 लाख नागरिकांची तपासणी होणार

Next Post
जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहीमेची पालमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात, 8 लाख नागरिकांची तपासणी होणार

जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहीमेची पालमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात, 8 लाख नागरिकांची तपासणी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add