नंदुरबार l प्रतिनिधी-
मूलभूत कर्तव्य पार पाडल्याशिवाय संविधानाचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले.
यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांकडून संविधान प्रत वाचन करून घेतले.
कर्तव्यनिष्ठ व जबाबदार नागरिक घडवण्यासाठी संविधानाचे वाचन फार महत्त्वाचे आहे तसेच संविधानाचे मूल्यअंगीकारल्याशिवाय संविधानाचा उद्देश पूर्ण होणार नाही असे त्यांनी प्रतिपादन केले.प्रा.नाईक यांनी प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्य पार पाडावीत असे आव्हान विद्यार्थ्यांना केले. प्रा.पंकज पाटील यांनी आपल्या मनोगतातून संविधानाविषयी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शैलेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संजय मराठे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षक विलास पाटील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.