नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील हि.गो.श्रॉफ कनिष्ट महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दिनेश बबन देवरे यांना सहाव्यांदा डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. प्रा.डॉ.दिनेश देवरे यांनी इंदौर येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यापीठ (मध्यप्रदेश) येथे ‘Dopamine Modulation of Honey Bee Central Olfactory Neuron’ या विषयातील संशोधनावर आधारीत प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
प्रा.डॉ.दिनेश देवरे यांना संशोधनासाठी प्रा.डॉ.संतोष पवार, प्रा.डॉ.मिनाक्षी सोलंकी, प्रा.डॉ.यादव, प्रा.डॉ.बी.एन.देवरे, प्रा.डॉ.पुजा दिनेश देवरे, सौ.उज्वला बबन देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच प्रा.डॉ.दिनेश देवरे यांचे आतापर्यंत ५० आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ३०० पुरस्कार मिळविले आहेत. विविध संशोधन क्षेत्रात ३२ सुवर्णपदक प्राप्त केले आहेत.
तसेच प्रा.डॉ.देवरे हे खानदेशातील एकमेव सहाव्यांदा डॉक्टरेट पदवी मिळविणारे ठरले आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात संशोधन करुन १२ विषयात भारत सरकारचे पेटंट तसेच आंतरराष्ट्रीय ३ पेटंट मिळविणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव प्राध्यापक आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.रमणलाल शाह, सचिव डॉ.योगेशभाई देसाई, प्राचार्या सौ.सुषमा शाह, उपप्राचार्य राजेश शाह, पर्यवेक्षिका सौ.सिमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा.प्रशांत बागुल आदींनी प्रा.डॉ.दिनेश देवरे यांचा सन्मान केला.