नंदुरबार l प्रतिनिधी
मोबाईल चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केल्याने एका परप्रांतीया मृत्य़ु झाल्याची घटना तळोदा शहारतील चिणोदा चौफुली जवळ घडली आहे.
या चौफुली नजीक काही परप्रांतीय कुटूब हे उघड्यावर राहतात. याठिकाणी काल रात्री बिहार मधील एक युवक आला असतां या कुटुंबीयांनी त्याला राहण्यासाठी आसरा दिला. मात्र त्याच दरम्यान सकाळी या कुटुंबीयांना मोबाईल चोरीला गेल्याचे दिसून आले. आणि संबीधीत युवक हा गायब असल्याचे दिसून आले. त्याचा शोध घेतला असता तो बस स्थानक परिसरात आढळून आला.
त्याला काही जणांनी पकडून आणत त्याला काठीने बेदम मारहाण केली. यानंतर पोलीसांच्या 112 नंबर वर आम्ही चोराल पकडून आणल्याचे कळवण्यात आले. याठिकाणी पोलीस पोहचल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्याचे सांगितले. मात्र त्याला जमावाने उपचारासाठी दाखल न करता पोलीस स्टेशनमध्ये आणले. आणि त्याला याठिकाणाहून उपचारासाठी नेत असतांनाच त्याचा मृत्यु झाला आहे. घटनेतील 28 वर्षीय मयत रंजयकुमार रामदेव पासवान हा बिहार मधल्या जितपुरचा रहिवासी असल्याचे समोर आले असून घटनेप्रकरणी काही महिला अल्पवयीनांसह सहा ते सात जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.