Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

team by team
May 30, 2026
in राजकीय
0
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

नंदुरबार l प्रतिनिधी-

विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या अनुषंगाने युवकांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सक्षम, कौशल्यसंपन्न आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६ – यंग प्रोफेशनल्स राउंडटेबल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली माय भारत नंदुरबार आणि झेप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.

नंदुरबारमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना राष्ट्रीय विकासाच्या चर्चेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉ. रेखा चौधरी यांच्या पुढाकारातून तसेच काकासाहेब महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला.

कार्यक्रमाला माजी आमदार शिरीषदादा चौधरी, डॉ. रेखा चौधरी, जिल्हा युवा अधिकारी भुषण पाटील, नंदुरबार नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, सोनिया देशमुख, डॉ. चंद्रकांत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. पॅनलिस्ट म्हणून डॉ. रेखा चौधरी, प्रा. युवराज भामरे आणि ॲड. सारांश सोनार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डिजिटल वेलनेस, मानसिक आरोग्य, डिजिटल व्यसनमुक्ती, नेतृत्व विकास, रोजगारक्षम कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवउद्योजकता आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या संतुलित युवा पिढी घडविणे आवश्यक असल्याचे मत डॉ. रेखा चौधरी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात सुमारे २०० युवक-युवती सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान युवकांनी कौशल्य विकास, रोजगार, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल शिस्त, नवकल्पना, उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्व या विषयांवर महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. युवक आणि तज्ज्ञांमधील मुक्त संवादातून अनेक विधायक विचार पुढे आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add