Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

team by team
May 30, 2026
in सामाजिक
0
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी

सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक सक्षमीकरणास चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजना” अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील नवदांपत्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत पात्र विवाहित जोडप्यांना एकूण रुपये १.५० लाखांचे अनुदान देण्यात येते. त्यामध्ये रुपये ७५ हजारांची रक्कम पोस्ट बचत स्वरूपात तसेच रुपये ७५ हजारांची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
कार्यक्रम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या हस्ते लाभार्थी नवदांपत्यांना धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना समाजामध्ये समान संधी व सन्मान मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमामुळे सामाजिक समावेशकता व दिव्यांग सक्षमीकरणाला सकारात्मक बळ मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

Next Post

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

Next Post
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add