म्हसावद । प्रतिनिधी:
शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन व कुसूमवाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला.
चिखली पुनर्वसन येथील दोन युवकांना जखमी करणारा बिबट्या ला पकडण्यात वन विभागाच्या यश मिळाले तसेच कुसुमवाडा येथील बकऱ्या ने गावातील बंजारा तांडा येथे एका घराच्या गोठयात बांधलेल्या बकऱ्या ना फस्त केल्या होत्या तसेच चिखली पुनर्वसन येथील बालक लवकुश बारक्या पावरा (वय 9) यांच्यावर हल्ला करीत गंभीर जखमी केले होते.
तर एक तासांनी काही अंतरावर बारक्या पावरा (8 वर्ष) यास शेताच्या बांध्यावर जखमी केले होते एकास ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते तर दुसऱ्यावर म्हसावद येथे उपचार सुरू होते.
परिसरात हा बिबट्या शेतकऱ्यांना तो रात्री संध्याकाळी फिरत असल्याचे दिसत होते यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण हहले होते याबाबत उमरटी शिवारात येथील एका शेतात बिबट्या ला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले होते अखेर हा बिबट्या पहाटे सुमारास पिंजऱ्यात अडकला.तरी देखील अजून एक बिबट्या चा मुक्तसंचार सुरू आहे त्याचा ही बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.