Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्रीडा प्रबोधनीत सरळ व चाचणीद्वारे खेळाडूंना प्रवेश देणार

team by team
July 3, 2024
in राज्य
0
क्रीडा प्रबोधनीत सरळ व चाचणीद्वारे खेळाडूंना प्रवेश देणार

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये सन 2024-25 साठी सरळ व कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना नवीन प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जेचे खेळाडू देण्यासाठी राज्यातील प्रतीभवन खेळाडूची निवड करून त्यानां संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविणे व सुसंघटीत करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधनी कार्यरत असून या प्रबोधनींमध्ये  प्रवेशासाठी 50 टक्के सरळसेवा व 50 टक्के कौशल्य चाचणीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपुर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणच्या क्रीडा प्रबोधनीमध्ये निवड प्रक्रीया होणार असून ज्युदो, जिम्नॅस्टीक, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन, अर्चरी, हॅन्डबॉल, वेटलिफ्टींग अशा एकूण 17 क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

क्रीडा प्रबोधिनीतील सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी खेळाडू हा संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे  अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबत समिती समक्ष चाचणी देऊन प्रवेश देण्यात येईल, क्रीडा प्रबोधिनीत खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे अशा खेळाडूना संबंधित खेळाचे कौशल्य चाचणीचे आयेाजन करुन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. या चाचणीमधून निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल.

जिल्हास्तरावर चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी 5 जुलै 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, खामगांव रोड, साक्री नाका नंदुरबार येथे संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हत्तीपाय रुग्णानाही मिळणार दिव्यांगाच्या सर्व सुविधा

Next Post

धुळे रस्त्यावरील भगदाडची पूजा करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध

Next Post
धुळे रस्त्यावरील भगदाडची पूजा करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध

धुळे रस्त्यावरील भगदाडची पूजा करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add