Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हत्तीपाय रुग्णानाही मिळणार दिव्यांगाच्या सर्व सुविधा

team by team
July 3, 2024
in राज्य
0
हत्तीपाय रुग्णानाही मिळणार दिव्यांगाच्या सर्व सुविधा

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील हत्तीपाय रुग्णांची पायाच्या सुजेवरुन तीव्रता तपासणी करुन त्यानुसार दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार असून आता हत्तीपाय रुग्णानाही दिव्यांगाच्या सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमातंर्गत हत्तीपाय व अंडवृध्दी हे हत्तीरोग आजाराचे लक्षण असून हत्तीपाय रुग्णांमध्ये ठराविक वृध्दीनंतर रुग्णाचा हालचालीवर कमालीची बंधने येतात. रुग्ण मुक्तपणे फिरु शकत नाही त्यामुळे ठोस कृती कार्यक्रम आखुन या रुणांना दिलासा देण्यासाठी अशा रुग्णांची तपासणी करुन दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत.

त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नुकतेच दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हत्तीपाय रुग्णांची तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 21 हत्तीपाय रुग्णांच्या पायाच्या सुजेवरुन तीव्रता तपासणी करण्यात आली असून त्यानुसार त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांनाही आता दिव्यांगाच्या सर्व सुविधा मिळतील.

या शिबीरास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पंकज बागुल, जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व हिवताप आरोग्य पर्यवेक्षक व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे 32 हजार 309 मतांनी विजयी

Next Post

क्रीडा प्रबोधनीत सरळ व चाचणीद्वारे खेळाडूंना प्रवेश देणार

Next Post
क्रीडा प्रबोधनीत सरळ व चाचणीद्वारे खेळाडूंना प्रवेश देणार

क्रीडा प्रबोधनीत सरळ व चाचणीद्वारे खेळाडूंना प्रवेश देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add