नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील माळीवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे नगरोथान योजनेतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माळीवाडा धानोरा रोड किसनदादा नगर येथिल सामाजिक सभागृह साठी 23.70 लक्ष
योगेश्वरी माता मंदिर जवळील सामाजिक सभागृह साठी 23.70 लक्ष मंजूर झाला असून
सदर निधी नंदुरबार चे पालकमंत्री ना. अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या शिफारस वरून राष्ट्रवादी शहराध्यक्ष मोहन रायभान माळी यांच्या मागणीवरून मंजूर केला आहे.
यावेळी भूमिपूजन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी नंदुरबार कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, शिवसेना महानगर प्रमुख विजय माळी, नगरसेवक जगनाथ माळी, रवींद्र जावरे तसेच बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणारे प्रताप किसन माळी व परिसरातील महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते