Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकल्प सुरू करून गतवैभव प्राप्तीसाठी एकत्रित प्रयत्न करणार, शहादा येथे मान्यवरांची ग्वाही

Mahesh Patil by Mahesh Patil
March 4, 2024
in राजकीय
0
प्रकल्प सुरू करून गतवैभव प्राप्तीसाठी एकत्रित प्रयत्न करणार, शहादा येथे मान्यवरांची ग्वाही

 

शहादा l प्रतिनिधी
परिसर विकासासह प्रकल्पांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वजण सोबत राहू असा सूर आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित,शहादा- तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांच्यासह मान्यवरांनी रविवारी झालेल्या जाहीर आभार सभेत व्यक्त केला.

 

 

 

लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी उंटावद-होळ ता. शहादाच्या संचालक मंडळ निवडणुकीत लोकशाही आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी परिसराचे नेते तथा सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील हे होते. यावेळी डॉ. विजयकुमार गावित, आ. राजेश पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर भामरे, ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, पंचायत समिती सभापती वीरसिंग ठाकरे, माजी सभापती माधवकाका पाटील, ज्येष्ठ नेते ईश्वर मंगेश पाटील, जिप कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी पंचायत समिती उपसभापती बापूजी जगदेव, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा .संजय जाधव, सातपुडा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग आहेर, ईश्वर भुता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

डॉ. गावित यावेळी बोलतांना म्हणाले, स्वर्गीय अण्णासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत परिसर विकासाचे प्रकल्प सुरू केले. सद्यस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या या प्रकल्पांना सुरू करून गतवैभव प्राप्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शेती व सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासोबतच तंत्रज्ञानासाठी सहकार्य करणार. केंद्र व राज्य सरकारकडून केळी,पपई,ऊस, कापूस आदी पिकांना योग्य भाव देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.शेतशिवारांसह परिसरातील रस्त्यांचे प्रश्नही सोडवू. प्रकाशा येथे महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरू करण्यासोबतच गुर्जर समाजभवनासाठी पाच कोटी रुपयांच्या निधी मंजूर करणार. नंदुरबार येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येत असल्याचेही डॉ. गावित यांनी म्हटले.

 

 

 

आ.पाडवी यावेळी बोलतांना म्हणाले, सूतगिरणी व सातपुडा साखर कारखाना सुरू व्हावे हाच आपला उद्देश असून शासनाकडे पुनर्वसन कर्जासाठी पाठपुरावा सुरू आहे. सहकार व शिक्षणातून परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासह प्रत्यक्ष कार्यातून विश्वास व विजय संपादन करता येतो. फक्त मोठमोठी भाषणे देऊन नव्हे. सूतगिरणी निकालानंतर कुठेही अटीशर्ती व अटीतटी दिसून आली नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
अध्यक्षीय समारोपात बापूसाहेब दीपकभाई पाटील म्हणाले, शेतकरी शेतमजूर कामगारांसह सर्वच घटकांचा आर्थिक विकास व्हावा.

 

 

 

 

छोटा माणूस ताठ मानेने जगायला पाहिजे हेच स्वर्गीय अण्णासाहेबांचे तत्व होते. त्यांनी उभारलेले प्रकल्प सद्यस्थितीत आर्थिक अडचणीत आहेत.यातून बाहेर काढण्यासाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत परिश्रम घेऊ. शेतकरी सभासदांची बाकी देण्यासाठी सरकार सोबतच विविध संस्थांकडून पैसा उभा करू. त्यासाठी आपणा सर्वांच्या साथीची गरज आहे. सभासदांनी व शेतकरी बांधवांनी चुकीच्या व्यक्तींच्या नादी लागू नये. आपण सारे जण या सहकारी प्रकल्पांचे मालक आहात. मालकांसारखेच राहा. सहकार चळवळ जिवंत ठेवणे आपल्या सर्वांचे जबाबदारी आहे. हजार दोन हजारात आपले मत विकू नये. अयोग्य व्यक्तींना कदापि थारा देऊ नये असेही त्यांनी म्हटले.
यावेळी डॉ. कांतीलाल टाटिया, ज्ञानेश्वर भामरे, प्रा. मकरंद पाटील, घनश्याम पाटील, सुप्रिया गावित यांनी परिसरातील प्रकल्पांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याविषयी सूर व्यक्त केला.

 

 

 

तत्पूर्वी रतिलाल पाटील पाडळदा, जगदीश पाटील निजर, सुनील पाटील शहादा, अनिल भामरे मंदाना ,प्राचार्य मेहमूद खाटीक शहादा, जिजाबराव पाटील धमाने, सुनीलभाई पटेल सुरत,भरत पाटील कोळदा, पांडुरंग चौधरी वडाळी,राजेंद्र वाघ सोनवद ,महेंद्र पाटील नंदुरबार यांची समायोजित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी केले. आभार मयूर दीपक पाटील यांनी मानले.

 

 

 

 

यावेळी जे.पी.पाटील, सुनील सखाराम पाटील, विजय विठ्ठल पाटील, उद्धव रामदास पाटील, ज्ञानेश्वर भिका चौधरी, रवींद्र रावळ, जगदीश पाटील, अनिल कुवर, सौ.जयश्रीबेन पाटील,सौ.माधवीबेन पाटील,अरविंद पाटील, सुनील रोहिदास पाटील,संजय दशरथ पाटील,डॉ.हेमंत सोनी, किशोर मोरे, सतीष जव्हेरी, रमाशंकर माळी, प्रा.आर.टी.पटेल, प्रा.एन.जे.पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे खुर्द येथे श्री नंदेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा

Next Post

पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार : डॉ.विजयकुमार गावित

Next Post
पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार : डॉ.विजयकुमार गावित

पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार : डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयाचे एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षदिंडी

शिवदर्शन विद्यालयाचे एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षदिंडी

July 14, 2025
सैनिकी विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम

सैनिकी विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम

July 14, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूल गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूल गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

July 14, 2025
शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

July 13, 2025
नंदुरबार पोलिसांनी केली विविध गुन्ह्यांची उकल,5 जणांना अटक

नंदुरबार पोलिसांनी केली विविध गुन्ह्यांची उकल,5 जणांना अटक

July 13, 2025
नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

July 7, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group