नंदुरबार l प्रतिनिधी
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथे श्री नंदेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे श्री नंदेश्वर महादेवयांची प्राणप्रतिष्ठा सोहळा एक मार्च २०२४ ते तीन मार्च २४ रोजी तीन दिवस होता. ब्रह्मलीन श्री. श्री. १००८ महंत जोगेश्वरानंद जी यांच्या आशीर्वादाने व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी भागवताचार्य श्यामचंद्र मुळे, प्रमोद जोशी, प्रशांत बयानी, एकनाथ देवळाली कर, श्रीकांत जोशी,भूषण जोशी यांच्या वेदमंत्राने संपन्न झाला. एक मार्च २४ रोजी सकाळी संपूर्ण गावातून शिवलिंग, त्रिशूल ,कळस, घंटा, यांची गावातून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली.
त्यानंतर प्रायचित्त संकल्प, कर्म प्रारंभ व जलधिवास करण्यात आला . दोन मार्च रोजी स्थापित देवपूजन, अस्थिस्थावर्त,धान्य दिवास, स्थापित देवता हवन, शयनाधिवास, आरती करण्यात आली. तिन मार्च रोजी प्रधान हवन, गर्भगृहात देवाची स्थापना, कलश स्थापना , पूर्णाहुती आरती होऊन ग्रामस्था तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यात आठ जोडपे सहभागी झाले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळा यशस्वी होण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी सहकार्य केले.