नंदुरबार l प्रतिनिधी
येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा बंजारा ब्रिगेडच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील नेहरू पुतळ्यापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्यासह असंख्य प्रतिष्ठित समाज बांधव उपस्थित होते.
सुरुवातीला संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाहण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास राठोड, संचालक गोपाल पवार, माजी उपसभापती प्रल्हाद राठोड, नंदुरबार पंचायत समिती उपसभापती तेजस पवार, बंजारा ब्रिगेडचे खान्देश विभागीय सचिव किशोर राठोड, माजी जि.प.सदस्य मुन्ना पाटील, बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते दिवाणसिंग बंजारा, शामा पवार, विक्रम चव्हाण, रवींद्र चव्हाण, रमेश पवार, दिलीप राठोड, पत्रकार जितेंद्र जाधव, लक्ष्मण जाधव, दामा राठोड, राजु पवार, जयसिंग पवार, तेजमल राठोड, रवी पवार, आसाराम पवार, आप्पा राठोड, राहुल पवार, मुकेश पवार, सचिन जाधव, गजू राठोड, हिरामण पवार, जीवन राठोड, ऍड.चंदू बंजारा, कृष्णा चव्हाण, देशमुख पवार, किशोर जाधव, आकाश जाधव, सचिन जाधव, रवींद्र पवार, जगन पवार, आतिष राठोड, गोपाल बंजारा, आकाश चव्हाण, करण राठोड, मनिष चव्हाण, प्रविण पवार, दरबार राठोड आदी उपस्थित होते.
मिरवणुकीत खा.डॉ.हिनाताई गावीत, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावदचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड.राम रघुवंशी, माजी नगरसेवक किरण रघुवंशी, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, डॉ.समिधा नटावदकर आदींनी भेट दिली.
मिरवणुकीत पारंपारिक पद्धतीने समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. संत सेवालाल महाराजांच्या घोषणा देत शहरातील बस स्थानक, अंधारे चौक, नगरपालिका व नेहरू पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी संत सेवालाल महाराजांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिलीन जाधव, युवा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा उपाध्यक्ष भिम राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.