Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

team by team
June 1, 2026
in राजकीय
0
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

नंदुरबार l प्रतिनिधी-

बंद पडलेले पशुवधगृह सुरू करण्या विषयीचा ठराव पारित करण्याचा प्रयत्न नंदुरबार नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी करताच भाजपा नगरसेवकांनी प्रचंड विरोध केला. बंद पडलेले कत्तलखाने आणि गो हत्या बंदी यावरून भाजपा नगरसेवकांनी शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. जोरदर निदर्शने करीत नगरपरिषदेचा निषेध करण्यात आला. यामुळे नंदुरबार नगर परिषदेची आजची सर्वसाधारण सभा अत्यंत वादळी ठरली. दरम्यान, नगरपरिषदेतील सत्ताधारी रघुवंशी गटाच्या शिवसेनेचे दिखाऊ आणि खोटारडे हिंदुत्व या निमित्ताने उघड झाले; अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली.

येथील नगरपरिषदेची आज दि.१ जून रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेतील अजेंड्यावर एकूण १२ विषय होते. यातील नंदुरबार नगरपरिषदेचे जुने पशुवधगृह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार दुरुस्ती करणे, या विषय क्रमांक 6 च्या माध्यमातून नगरपरिषदेतील शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांनी कत्तलखान्यांचा विषय अजेंड्यावर आणला. याबद्दल भाजपा नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हिरालाल चौधरी, आनंद माळी, पंकज चौधरी,चारूदत्त कळवणर, रेखा चौधरी, सरिता माळी, सुष्मा गावीत, शोभा चौधरी, निता मराठे,नरेश काकंरीया लक्ष्मण माळी, प्रकाश भोई,आकाश चौधरी, सतीश मराठे,जयेश चौधरी,दीपक चौधरी,निखिल चौधरी यांनी याप्रसंगी निदर्शने केली. तर भाजपा नगरसेवक पंकज चौधरी यांनी लेखी हरकत नोंदवून या विरोधात लाक्षणीक उपोषण करण्याचा जाहीर इशारा दिला.

भाजपा नगरसेवकांचा सभा त्याग

दुरुस्ती करण्याच्या नावाखाली बंद पडलेले कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याचा नगरपालिकेने रचलेला डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही; असा निर्धार व्यक्त करीत सभागृहामध्ये प्रचंड विरोध करण्यात आला त्यानंतर भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी सभा त्याग करून नगर परिषदेच्या वरांड्यात उभे राहून फलक झळकवले. गोहत्या बंद करा, अशा घोषणा देत जोरदार निषेध नोंदवला. गो हत्येचे पाप चालू ठेवण्याला प्रोत्साहन देऊन नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्व विरोधात भूमिका घेतली असून या नकली हिंदूंचा आम्ही तीव्र निषेध करतो. नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरवले जाणे अपेक्षित असताना बंद पडलेल्या पशुवधगृहांची दुरुस्ती करण्यामागे नंदुरबार शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू करण्याचे रघुवंशी गटाचे षडयंत्र आहे. नगरपालिकेने हा ठराव रद्द न केल्यास आम्ही रस्त्यावर मोठे जन आंदोलन उभारू; असा इशारा या प्रसंगी भाजपाचे विरोधी गटनेते हिरालाल चौधरी, आनंदा माळी, प्रकाश भोई, भाजपाचे शहरप्रमुख कांकरिया, नगरसेवक पंकज चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

‘त्या’ जैन नगरसेवकांचा कत्तलखान्यांना पाठिंबा?

नंदुरबार शहरातील जैन समाजाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख नगरसेवक शिंदे गटातील सत्ताधाऱ्यांकडे आहेत. गो हत्येला पाप मानणारे अहिंसा पुजक म्हटले जाणारे जैन धर्मीय नागरिकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या परंतु कत्तलखान्यांचा विषय मंजूर केला जात असताना या दोन नगरसेवकांनी अनुपस्थित राहून मुकसंमती दर्शवली. एक प्रकारे त्यांनी कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याला पाठिंबा दर्शवला असून ही अत्यंत निषेधार्य बाब आहे; असे हिरालाल चौधरी यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

पंकज चौधरी यांची लेखी हरकत; प्रशासनाने दिलेल्या जुन्या हमीची दिली आठवण

सभेला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपा नगरसेवक पंकज नामदेव चौधरी यांनी या विषयावर लेखी हरकत घेऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रितसर निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार नगरपरिषदेचे पशुवधगृह हे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. असे असतांना बेकायदेशीर पणे दुरुस्तीच्या नावाखाली पशुवधगृह चालू करण्याचा हेतू सत्ताधारी आणि प्रशासनाचा दिसून येत आहे. नंदुरबार शहरातील बंद अवस्थेत असलेले पशुवधगृह मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंचा रहिवास असलेल्या दाट लोकवस्तीत आहेत. हे पशुवदगृह चालू करण्यास हिंदूंप्रमाणेच काही मुस्लिम नागरिकांचा देखील विरोध आहे. सदर पशुवधगृह 2015 साली चालू करण्याचा प्रयत्न झाला असता शहरात सामाजीक सलोखा बिघडून कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस मी स्वतः आणि शहरातील अनेक हिंदूप्रेमी उपोषणाला बसले होते. काही मुस्लीम बांधवांनी प्रशासनाकडे लेखी हरकत नोंदवलेली होती. त्यावेळेस सदर पशुवधगृह चालु करणार नाही अशी लेखी हमी प्रशासनाने दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यात गोवंश हत्या बंदी केलेली आहे. तसा कायदा शासनामार्फत पारीत करण्यात आलेला आहे. असे असतांना आणि या सर्व बाबी ज्ञात असतांना देखील नगरपालिका ठरावाच्या माध्यमातून पुन्हा तसे करू पाहत आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. तरी अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घाईघाईने घेऊ नये, अन्यथा या विरोधात सर्व भाजपा नगरसेवक व हिंदू समुदायाच्या वतीने तीव्र जनांदोलन उभारण्यात येईल , असे पंकज चौधरी यांनी लेखी हरकतीत म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

Next Post

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

Next Post
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add