नवापूर l प्रतिनिधी
नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि. च्या
चेअरमनपदी निलेश गोविंदराव वसावे तर व्हा. चेअरमनपदी रशीदभाई टिमोल बिनविरोध निवड करण्यात आली.
नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि. नवापूर च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा बँकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सह.संस्था नवापूरचे डॉ. शितल महाले यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा. चेअरमन या पदाधिकारींची निवड करणेकरीता बोलविण्यात आलेली होते. चेअरमन पदासाठी निलेश गोविंदराव वसावे तर व्हा.चेअरमनपदी रशीदभाई युसूफभाई टिमोल यांनी एकमेव अर्ज दाखल केल्यामुळे चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक सर्वसंमतीने बिनविरोध निवड झाली असून
बँकेच्या सर्व संचालकांनी व कर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन बँकेचे मावळते चेअरमन श्रीमती. सरलाताई गोविंदराव वसावे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया पार पाडणे करिता सहकारी संस्था नवापूरचे निवडणूक
निर्णय अधिकारी डॉ. शितल महाले व प्रकाश खैरनार यांनी नियोजन केले नवनिर्वाचित संचालकांना डॉ. महाले यांनी सहकार चळवळ योग्यपध्दतीने रुजविण्याच्या दृष्टीने व बँक प्रगतीपथावर नेणेसाठी योग्य ती अंमलबजावणी करण्याचे मार्गदर्शन केले श्रीमती. सरलाताई वसावे यांनी नवनिर्वाचीत संचालकांचे शाल व पुष्पगुच्छा देऊन सत्कार केला.
नवनिर्वाचित संचालक मंडळ निलेश गोविंदराव वसावे चेअरमन, रशीदभाई टिमोल व्हा. चेअरमन, व सर्व संचालक मंडळ विनय गोविंदराव वसावे,डॉ. सुनिल छगन पाटील, अरुण भरत गावीत,चंद्रकांत वामन सोनार,मुरलीधर वेडू दुसाणे, उमाकांत नारायण खैरकर, निर्मल नंदकिशोर थोरात, चंद्रशेखर बळीराम बेंद्रे, श्रीमती. रमिला दिनेश गावीत, श्रीमती. रमिला दिनेश गावीत, अॅङ प्रदिप गिरजी गावीत, रिचीभाई चंद्रेश शाह याप्रमाणे बिनविरोध निवडून आले असून सर्व स्तरातून नवनिर्वाचीत संचालकांचे अभिनंदन केले जात आहे.
व्हा.चेअरमन रशीदभाई टिमोल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन बँकेचे असी.मॅनेजर संजय शिंदे यांनी तर आभार बंकेचे संचालक चंद्रशेखर बेंद्रे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेच्या सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.