नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नंदूरबार तालुका पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस व राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूरबार तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून का. वि.प्र. संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील का. वि. प्र. संस्थेचे सचिव भिका पाटील , नंदूरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड , तसेच पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, उपस्थित होते.
भालेरच्या सरपंच सौ एस.पी.पाटील , विद्यालयाच्या प्राचार्या सौ व्ही. बी. चव्हाण, आर्यन बोरसे उपस्थित होते. यावेळी श्री.महाजन यांनी अमली पदार्थ होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. निलेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विषयी जनजागृती पर माहिती दिली तसेच कमलाकर चौधरी यांनी देखील मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अनिल सोनवणे , पोलीस नाईक गुलाबसिंग वसावे व महिला पोलिस कॉन्स्टेबल गीता लोहार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. ईशी यांनी केले.








