Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे व्हॉईस ऑफ नंदुरबार करावोके स्पर्धा

team by team
June 27, 2023
in सामाजिक
0
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे व्हॉईस ऑफ नंदुरबार करावोके स्पर्धा

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार तर्फे व्हॉईस ऑफ नंदुरबार या करावोके खुली गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे ऑडिशन  दि.१६ व २३ जुलै (रविवार) रोजी राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय, शहादा रोड, नंदुरबार येथे होणार आहे.

 

 

स्पर्धेत दोन गट करण्यात आले असून लहान गटात १५ वर्षाआतील स्पर्धकांचा समावेश असेल, तर मोठ्या गटात १५ वर्षावरील स्पर्धकांचा समावेश राहणार आहे. ऑडिशन फेरीतील विजेत्यांची अंतिम स्पर्धा दि.३० जुलै २०२३, रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे होईल. व्हॉईस ऑफ नंदुरबार ही स्पर्धा या वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

 

 

 

या स्पर्धेतील मोठ्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांना ११००० रुपये, ७००० रुपये, ५००० रुपये,  लहान गटातील विजेत्यांना ७००० रुपये, ५००० रुपये, ३००० रुपये किंमतीचे आकर्षक भेटवस्तू स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येतील. सदर स्पर्धा पारदर्शक व उच्च दर्जाची व्हावी, या उद्देशाने स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील संंगित क्षेत्रातील तज्ञ व नामवंत गायक परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेच्या नोंदणीसाठी यशतंत्र डिजिटल, आमदार कार्यालयासमोर नंदुरबार, राज कॉम्प्युटर, बालाजी वाड्यासमोर नंदुरबार या ठिकाणी संपर्क साधावा.

 

 

 

तसेच ऑडिशनच्या ठिकाणी देखील नोंदणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेणार्‍या स्पर्धकांनी ऑडिशनसाठी स्वतःचा करावोके ट्रॅक सोबत आणावयाचा आहे. अधिक माहितीसाठी ७०२०८३१६१७, ८८३०८७८०६४, ९४२३९४०६७४, ८०८७५१५३०९, ९९२३१२९७८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.  या स्पर्धेत जास्तीत जास्त संगित प्रेमी स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, सचिव आकाश जैन, प्रोजेक्ट चेअरमन नागसेन पेंढारकर, को-चेअरमन किरण दाभाडे, प्रा.राहुल मेघे, राहुल पाटील व रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

भालेर येथे अमली पदार्थ दिवस साजरा

Next Post
भालेर येथे अमली पदार्थ दिवस साजरा

भालेर येथे अमली पदार्थ दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add