नंदुरबार | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रोझवा डॅम मागील अनेक वर्षापासून साठवलेल्या पाण्याला गळती असल्यामुळे पाण्याचा साठा होत नव्हता, परिणामी डॅम असूनही परिसरातील भाग पाण्यापासून वंचित होता. आ.राजेश पाडवी आमदार झाल्यापासून सातत्याने रोझवा डॅम च्या दुरूस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत डॅम दुरुस्ती मंजूर करण्यात आली. आज आ.राजेश पाडवी यांनी रोझवा डॅम येथे प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
यावेळी आ.राजेश पाडवी म्हणाले, रोझवा डॅमचा पुनरुस्तीने परिसरातील मोठ्या प्रमाणावर भूभाग हा सुजलाम सुफलाम होत शेतकर्यांना व गावकर्यांना याचा फायदा होईल. यावेळी शेतकरीं व गावकर्यांची अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वात येत असल्याने आ. पाडवी यांचे आभार मानले. या पाहणी वेळी विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, रोझवा ग्रामपंचायतचे सरपंच, लक्कडकोट माजी सरपंच जोलू पाडवी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.








