Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

team by team
February 12, 2026
in राजकीय
0
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार शहरात घरपट्टी, नळपट्टी व विविध प्रकरचे टैक्स लावुन वसुल करण्यात येत आहे परंतु मागील काही वर्षापासुन थकलेल्या नगर पालिकेचे घरपट्टी, नळपट्टी मध्ये मुळ रक्कमेत अधिक प्रकारचे दंडात्मक व्याज लावण्यात आलेले आहे.

नंदुरबार नगर परिषदेने थकीत मुळ रक्कमच वसुल करावी त्यावर कोणत्याही प्रकारचे अधिकचे दंडात्मक व्याज लावू करु नये .

त्यावर सुट देण्यात यावी तसेच थकलेल्या मुळ रक्कमेत नागरिकांना सवलत देऊन दोन-तीन हप्तात घरपट्टी वसुल करण्यात यावी. कारण नंदुरबार शहरात कोणत्याही प्रकारचे कामधंदे नसुन महागाईमुळे जनता त्रस्त झालेली आहे.

त्यांचा कडे पैसे नसल्यामुळे नागरिक इकडुन तिकडून पैसे गोळा करुन घरपट्टी व पाणीपट्टी भरत आहे म्हणून अश्या सर्व लोकांचा विचार करुन थकलेल्या घरपट्टीवर
कोणत्याही प्रकारचे अधिकचे दंडात्मक व्याज लावण्यात येवु नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

सदर मागणीची निवेदन मुख्याधिकारी शिवांश सिंग यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी,उपजिल्हाप्रमुख डॉ हेमंत शर्मा,उप तालुकाप्रमुख,बापू महाजन,महेंद्र गिरासे,सुनिल पवार,अल्पसंख्याक सेल चे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी ,किसान सेल चे तालुकाप्रमुख निंबा पाटील,उदेसिंग रामसिंग,इम्तियाज खान,जाफर शहा,बबलू नागरे व शिवसैनिक उपस्थित होते.

जर आठ ते पंधरा दिवसात योग्य ती कारवाई केली नाही तर शिवसेना नगरपालिका कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल व होणाऱ्या सर्व परिणामाला प्रशासन जवाबदार राहील

बातमी शेअर करा
Previous Post

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

Next Post

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

Next Post
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add