Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

team by team
February 12, 2026
in राज्य
0
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

नंदुरबार | प्रतिनिधी

तोरणमाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी तोरणमाळ महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा आज घेण्यात आला. महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा व व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींची पाहणी करण्यात आली.

यावेळी पर्यटकांसाठी उपलब्ध निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता तसेच अन्य मूलभूत सुविधा तपासून पाहण्यात आल्या. महोत्सवाच्या कालावधीत पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन व गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महोत्सवाच्या आधी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता व कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याबाबत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिले. महोत्सव स्थळ परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी मा. आमदार आमश्या पाडवी यांनी तोरणमाळ महोत्सवास दरवर्षी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले. महोत्सव अधिक आकर्षक व यशस्वी करण्यासाठी प्रशासन, स्थानिक यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक विकासाला चालना देणारा तोरणमाळ महोत्सव जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

Next Post

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

Next Post
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add