म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती साजरी करण्यात आली. वाजपेयी वाचनालयाचा द्वितीय वर्धापन दिन असल्याने हा दिवस एकत्रित साजरा करण्यात आला. प्रारंभी मा. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक रवींद्र जमादार, प्राचार्य प्रदीप पाटील,वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.
ज्ञानी कुलकर्णी, सचिव प्रा संपत कोठारी, संचालक के. के. सोनार भाजपाचे शहराध्यक्ष विनोद जैन, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी, अनिल भामरे, माधव पाटील, पत्रकार नेत्रदीपक कुवर,ऋषभ जैन,वाचनालयाचे वाचक सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अटल बिहारी यांना विनम्रपणे आदरांजली वाहिली. यावेळेस पुस्तके खरेदी साठी रवींद्र जमादार, सौ.कल्पना भरत चौधरी,राजाराम तुकाराम पाटील (लोणखेडा) यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचनालयला रोख देणगी दिली.
निवृत्त इंजी.रघुनाथ पाटील ,माधव पाटील,यांनी आपल्या कडील पुस्तके भेट दिली. प्रा.मकरंद पाटील, रवींद्र जमादार यांनी अटल बिहारी यांचा आपल्या मनोगतातून गौरव केला.प्रा ज्ञानी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संपत कोठारी यांनी केले.








