नंदूरबार l प्रतिनिधी
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव भिका पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सरपंच सौ. एस. पी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ. के. सी. पाटील, माजी पर्यवेक्षक पी.पी बागुल, प्राचार्य सौ. विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर व सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक . व्ही. व्ही. ईशी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील खडतर प्रवास व त्यांनी पाहिलेल्या भारताचे स्वप्न याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.