Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

team by team
April 25, 2026
in क्राईम
0
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी-

शहादा मार्गे गुजरात राज्यात चोरट्या पद्धतीने नेण्यात येणाऱ्या अवैध विदेशी दारूवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 28 लाख 87 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून (क्र. MH 14 GD 7497) अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहादा शहरातील शिरुड चौफुली परिसरात शहादा-प्रकाशा मार्गावर सापळा रचला.

पहाटे सुमारे 5.30 वाजता संशयित वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून चौकशी केली. वाहनचालकाने समाधानकारक उत्तरे न दिल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यात 217 खोक्यांमध्ये भरलेली अवैध विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी देवेंद्र खुमाराम मेघवाल (वय 26, रा. पाली, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले.

या घटनेप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

बातमी शेअर करा
Previous Post

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

Next Post

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add