नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींचे सन २०२० ते २०२५ मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची २२ ग्रामपंचायतींची सोडत आज काढण्यात आली.त्यामुळे नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींमध्ये धडगांव तालुक्यातील १९ तर नवापूर , नंदुरबार, अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींचे सन २०२० ते २०२५ मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सभा आज १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी दुपारी १२ वाजता बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे पार पडली.
जिल्ह्यातील नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची २२ ग्रामपंचायतींची सोडत आज काढण्यात आली.यात धडगांव तालुक्यातील १९ तर नवापूर , नंदुरबार, अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायती
मांडवी खुर्दे,खडकाला खुर्दे, बोदला, निगदी, उडद्या, कुवरखेत, तेलखेडी, शेलकुई, वलवाल, झापी, सिंदीदिगर, फलई, भादल. आट्टी, माळ, खुटवाडा, शेलदा, सिरसाणी, कामोद खुर्दे यांचा समोवश आहे.तर नंदुरबार तालुक्यातील घुली, नवापूर तालुक्यातील वाटवी व अक्कलकुवा तालुक्यातील माळ ग्रामपंचायतीत महिला राज राहणार आहे.या सभेसाठी उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांना प्राधिकृत करण्यात आले हेते.








