Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

team by team
November 18, 2022
in क्राईम
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नंदुरबार | प्रतिनिधी-

धडगांव तालुक्यातील भमाने येथील २ वर्षापूर्वी अपहरण करुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडून गुजरातमधून सुटका करण्यात आली आहे.सदर मुलीस तीच्या आई वडीलांकडे सुपुर्त करण्यात आल आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी कि भमाने ता. धडगांव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला झापीचा मांजरी पाडा येथील राहाणारा पुणाश्या आपसिंग चौधरी (नाईक) याने १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास पळवून नेले म्हणून म्हसावद पोलीस ठाण्यात मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून पुणाशा आपसिंग चौधरी (नाईक) रा. झापीचा मांजरी पाडा ता. धडगांव याच्याविरुध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा प्रारंभीचा तपास म्हसावद पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत होता, परंतु गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी झाल्यानंतर देखील संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलगी मिळुन येत नव्हती, म्हणून पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाकडे सोपवून संशयीत आरोपीतास तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.

 

 

 

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करुन संशयीत आरोपी व गुन्ह्यातील अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी यांच्याबाबत माहिती काढण्यासाठी एक पथक तयार केले.

 

 

 

पथकाने संशयीत आरोपीचे गाव झापीचा मांजरी पाडा व गुन्ह्यातील अपहरण झालेली अल्पवयीन पिडीत मुलीचे गाव भमाने ता. धडगांव येथे जावून माहिती घेतली असता आरोपीताने अल्पवयीन मुलीला गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यामधील पछाई येथे पळवून घेवून गेलेला असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाली. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदारांचे एक पथक तयार करुन तात्काळ पछाई जि. भावनगर येथे रवाना केले. पथकाने संशयीत आरोपी याची संपूर्ण माहिती प्राप्त केली असता तो पछाई गावात एका शेतात मजुर म्हणून काम करीत असल्याचे समजले.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सुरुवातीस पछाई ता. वल्लभीपूर जि. भावनगर येथे जावून संशयीत आरोपी ज्या शेतात मजुर म्हणून काम करीत होता,

 

 

 

त्याबाबत माहिती काढली. तसेच त्याच्या घराच्या आजु-बाजूला वेषांतर करुन अत्यंत योजनापूर्वक सापळा रचला, परंतु संशयीत आरोपीतास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यास शिताफीने व गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. संशयीत आरोपी पुणाश्या आपसिंग चौधरी (नाईक) रा. झापीचा मांजरी पाडा, ता. धडगांव जि. नंदुरबार  यांच्या घरातुन पथकाने अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करुन पिडीत मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देवून आरोपीतास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

 

 

 

नैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अभिनंदन करुन पथकास बक्षीस जाहीर केले आहे. तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उप निरीक्षक  प्रदिपसिंग राजपुत, पोलीस हवालदार विनोद जाधव, महिला पोलीस नाईक अरुणा मावची, तुषार पाटील यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील आरक्षण सोडत : धडगांव तालुक्यातील १९ नवनिर्मित ग्रामपंचायतींत महिलाराज

Next Post

इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add