Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 33 हजार महिलांना लाभ, मातृ वंदना सप्ताहांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन

team by team
September 1, 2021
in आरोग्य
0
जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आतापर्यंत 33 हजार 620 पात्र महिलांना लाभ देण्यात आला असून 13 कोटी 42 लक्ष इतके अनुदान डीबीटी पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहे. नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी  1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागल्यास अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांच्या व नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य चांगले रहावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात सुरू केली आहे.
या योजनेतंर्गत 1 जानेवारी 2017 रोजी  किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये 5 हजार रुपयांचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी देण्यात येतो. पहिला टप्पा एक हजार रुपये असून मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर देण्यात येतो. यासाठी गर्भधारणा नोंदणी शासकीय आरोग्यसंस्थेत करणे आवश्यक असते. दुसरा टप्पा दोन हजार रुपये असून गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास देण्यात येतो. तिसरा टप्पा दोन हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बीसीजीपासून बाळाचे प्राथमिक लसीकरण पुर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.
अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून या सप्ताहात नवीन लाभार्थी नोंदणी, आधार शिबीर, बँक खाते शिबीर घेण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी

Next Post

आर्चरी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रमोद चांदूरकर यांची नंदुरबार येथे भेट

Next Post
आर्चरी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रमोद चांदूरकर यांची नंदुरबार येथे भेट

आर्चरी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रमोद चांदूरकर यांची नंदुरबार येथे भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add