Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देशातील वाढत्या हिंसाचार्‍याचा विरोधात कारवाई करावी : विश्व हिंदू परिषदेची मागणी

team by team
June 23, 2022
in राजकीय
0
देशातील वाढत्या हिंसाचार्‍याचा विरोधात कारवाई करावी : विश्व हिंदू परिषदेची मागणी

नंदुरबार l जीवन माळी
देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक जीहादी कट्टरता वाढत आहे .हिंदूंवर योजनापूर्वक हल्ले होत आहेत .यावर्षी प्रतिपदा आणि प्रभू श्रीरामाच्या प्रकट दिनानिमित्त रामनवमीला आयोजीत देशभरातील मिरवणूकांवर दगडफेक आणि हल्ले करण्यात आले.

काही ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीवर दगडफेक झाली,यामुळे देशभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. .हिजाबच्या वादातून कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली ,नुकतेच नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरून हिंदूंची घरे दुकाने आणि वाहने जाळण्यात आली.

तसेच सरकारी मालमत्ता आणि मंदिराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. बंगाल ,केरळ सारख्या राज्यांची सरकारे या इस्लामिक जिहादीच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे .

या हल्ल्यामुळे संपूर्ण देशातील हिंदू समाज दुखावला असून संतप्त झाला आहे देशभरातून हिंदू समाज या घटने विरोधात धरणे आणि निवेदनाद्वारे तीव्र संताप व्यक्त करीत आहे .

जे मुस्लीम धर्मनिरपेक्ष नेते भडकाऊ भाषण करतात त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून जिल्हा बंदी कारवाई करावी ,ज्या हिंदू लोकांना धमकावले जाते त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी व धमकी देणार्‍यावर कारवाई करावी ,ज्या मशिदी मदरसे मधून उन्मादी जमाव बाहेर पडला त्यांची चौकशी व्हावी.

इस्लामी जिहादी धर्मांधता पसरून देशात हिंसाचार पसरवणार्‍या कट्टरपंथी संघटनावर तात्काळ बंदी घालावी.ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्यांक आहे तेथे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले .

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री अजय कासार ,सह सेवा प्रमुख किशोर तांबोळी, नंदुरबारचे प्रखंड मंत्री महेंद्र सोनी, हिंदू जागरण मंचाचे प्रमुख देवा कासार ,प्रखंड सहमंत्री गोपाल बुनकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सदस्य पुरुषोत्तम काळे ,जिल्हा कोषाध्यक्ष रामचंद्र सोनार, बजरंग दल संयोजक कोमल शर्मा , प्रांतगोरक्षा समिती सदस्य केतन रघुवंशी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार: मा.आ. उदेसिंग पाडवी

Next Post

शहादा येथील शारदा कन्या विद्यालयात गुणवंताचा सत्कार

Next Post
शहादा येथील शारदा कन्या विद्यालयात गुणवंताचा सत्कार

शहादा येथील शारदा कन्या विद्यालयात गुणवंताचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add