नंदूरबार l प्रतिनिधी
पथराई ता.नंदुरबार येथील के.डी गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रल्हाद संदानशिव बी.डी. वळवी व शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.संदानशिव यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा आदर्श घेऊन देशप्रेम, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. संदीप ईशी यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि शिक्षणाविषयीच्या विचारांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वळवी यांनी केले तर प्रा.अमरजीत आरंभी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.








